Yojanadoot Result – योजनादूत निवड यादी, असा बघा निकाल

CM Yojanadoot Result : मुख्यमंत्री योजनादूत भरती द्वारे 50 हजार पदांची भरती केली जात आहे, या भरती द्वारे पात्र उमेदवारांना 6 महीने इंटर्नशिप साठी निवड केली जात आहे, आतापर्यंत 1 लाख 75 हजार पेक्षा जास्त युवकांनी या योजने साठी अर्ज केला आहे. लवकरच यांची निवड (Selection List) जाहीर केली जातील

योजनादूत अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर होती, आता जिल्हया पातळी वर पात्र उमेदवारांची छाननी सुरू आहे, लवकरच यांची यादी, अधिकृत CM yojanadoot वेबसाइट वर जाहीर करण्यात येईल.

मुख्यमंत्री योजनादूत निवड प्रक्रिया : Yojanadoot Selection

  • योजनादूत भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे जिल्हा स्तरावर केली जाईल.
  • ऑनलाइन प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यावर, पात्र उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी (Yojana Doot List) जाहीर केली जाईल.
  • त्यानंतर, यादीतील पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल (जसे की शैक्षणिक आणि वयोमर्यादेविषयक कागदपत्रे).
  • त्यानंतर, पात्र उमेदवारांशी 6 महिन्यांचा करार केला जाईल.

असे बघा निवड यादी

  • अधिकृत वेबसाइट महा योजनादूत ला भेट द्या
  • आपला यूजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • अर्जदारची निवड झाल्यानंतर, कॉन्ट्रॅक्ट टॅबमध्ये अर्जदार त्याची सद्यस्थिती पाहू शकतो.

अर्जदार contract View करून तो स्वीकारू शकतो.

अर्ज स्वीकारताना उमेद वारला आपली बँक डिटेल्स द्यावी लागेल..

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जदार कॉन्टॅक्ट टॅबमध्ये आपली निवड झालेली दिसेल.

कागदपत्रे तपासणी साठी यादी

  • ओळखपत्र- आधार कार्ड/मतदान कार्ड / पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस / etc
  • शैक्षणिक कागदपत्रे – दहावी/ बारावी/ डिप्लोमा/ पदवी मार्कशीट/सर्टिफिकेट
  • डोमिसाइल सर्टिफिकेट
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक पासबूक
  • सर्व कागदपत्रांच्या साक्षणकीत प्रती

मुख्यमंत्री योजनादूत कार्य

  • योजनादूत म्हणून निवडलेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी योजनांची माहिती व प्रशिक्षण देणार आहेत.
  • प्रशिक्षणानंतर, योजनादूतांना त्यांच्या नियुक्त केलेल्या ठिकाणी जाऊन नागरिकांना योजनांची माहिती देऊन सरकारी योजनांबद्दल समाजात जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे.
  • राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करताना, योजनादूतांना ग्रामीण पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करावा लागेल.
  • तसेच, दैनंदिन कामाचा (नमुन्याप्रमाणे) अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या योजनादूत यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल, व त्यांना दर महिन्याला 10,000 वेतन दिले जातील. तुमची निवड यादी बघण्यासाठी अधिकृत वेबसाइट ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा